जय शाहांनी रोहित शर्माच्या प्रश्नावर थेट उत्तर दिलं, पण चाहत्यांच्या मनातील घालमेल आणखी वाढली!
Jay Shah on Rohit Sharma : T20 विश्वचषक 2024 ला अजून जास्त वेळ उरलेला नाही. आगामी T20 विश्वचषक जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघानेही टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. भारताने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-20 सामने खेळले. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच भूमीवर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.
T-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार याबाबत सस्पेंस कायम आहे. रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा अधिकृत कर्णधार असेल, पण गेल्या एका वर्षात त्याने भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. रोहितचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना गेल्यावर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध होता.
जय शाह यांचं कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य
पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव शाह यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी अद्याप पुरेसा वेळ असल्याचे जय शाह यांनी सांगितले.
जय शाह यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ‘आता यावर खुलासा करण्याची गरज काय? जूनमध्ये टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. त्याआधी आमची आयपीएल आणि अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका आहे. बीसीसीआयच्या स्वत:च्या जमिनीवर बांधले जाणारे नवे एनसीए पुढील वर्षी ऑगस्टपासून कामाला सुरुवात करेल, असेही शाह यांनी सांगितले.