ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? जयंत पाटीलांनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले…

मुंबई : (Jayant patil On Mahavikas Aghadi Formula) महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तयार केला असल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात प्रत्येकी १६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत अनेक नेत्यांना प्रश्न विचारले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना नटोले यावर म्हणाले की, याबाबत केवळ प्राथमिक चर्चा झाली आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसास्थानी झाली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत प्रश्न विचारल्यावर आव्हाड म्हणाले. मला काहीच माहिती नाही. मी त्या बैठकीत आंधळा, मुका आणि बहिरा होतो.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी काही फॉर्म्युला बनवला आहे का? यावर जयंत पाटील यांनी सविस्तर उत्तर दिलं. जयंत पाटील म्हणाले, आम्ही सध्या कोणताही फॉर्म्युला तयार केलेला नाही. प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकद आहे तिथे त्या पक्षाला प्रयोरिटी देऊ.

जयंत पाटील म्हणाले, तिन्ही पक्ष आणि इतर घटक पक्ष ज्यांनी महाविकास आघाडीला २०१९ मध्ये पाठिंबा दर्शवला होता. त्यांना विश्वासात घेतलं जाईल. सर्वांशी चर्चा केली जाईल आणि आम्ही तिकीट वाटपाची तयारी सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये