ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

बिस्लेरीला मिळाल्या नवीन सीईओ; जाणून घ्या कोण आहेत जयंती चौहान?

मुंबई | आघाडीची कंपनी असलेल्या बिस्लेरीला (Bisleri) आता नवीन सीईओ (CEO) मिळाला आहे. सुरूवातीला बिस्लेरी कंपनीनं टाटा समूहासोबत (TATA Group) करार केला होता. मात्र हा करार रद्द झाल्यानंतर आता बिस्लेरीला नवीन सीईओ मिळाल्या आहेत. आता जयंती चौहान या बिस्लेरी कंपनीच्या सीईओ असणार आहेत. जयंती चौहान (Jayanti Chauhan) या बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांची मुलगी आहे.

आता बिस्लेरीची जबाबदारी जयंती चौहान यांच्याकडे असणार आहे. बिस्लेरी कंपनी खरेदी करण्यासाठी टाटा समूहाची बोलणी सुरु होती. मात्र हा करार आता रद्द झाला आहे. याबाबतची माहिती बिस्लेरीचे चेअरमन रमेश चौहान यांनी दिली आहे. रमेश चौहान यांनी सांगितलं की, आता आम्ही आमची कंपनी विकणार नाही. माझी मुलगी जयंती चौहान आता बिस्लेरी कंपनीची नवीन सीईओ असून ती आता या व्यवसायाची जबाबदारी सांंभाळेल. कंपनीनं टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (TCPL) सोबत करार रद्द झाल्यानंतर आता जयंती यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

जयंती चौहान कोण आहेत?

जयंती चौहान या बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान यांची मुलगी आहे. त्या 42 वर्षांच्या आहेत. जयंती चौहान यांचं बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क शहरात गेलं आहे. त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर लॉस एंजेलिसमधील FIDM प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं शिक्षण घेतलं आहे. तसंच त्यांनी लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं आहे. अनेक आघाडीच्या फॅशन हाउसमध्ये इंटर्न म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. सध्या जयंती चौहान बिस्लेरी इंटरनॅशनल कंपनीच्या उपाध्यक्षा (Vice Chairperson) आहेत. आता जयंती मुख्य कार्यकारी अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील बिस्लेरी कंपनीचा व्यवसाय सांभाळतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये