ताज्या बातम्यारणधुमाळी

“शरद पवारांसोबत जे गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला…”, भाजप आमदाराची खोचक टीका

कराड | Jaykumar Gore On Sharad Pawar – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (Shinde Group) असा सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसंच राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही लक्ष्य केलं असून त्यांच्या पक्षानं शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न चालवल्याचाही आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. आता भाजपकडून शरद पवारांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी यांनी काल (26 सप्टेंबर) कराडमधील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांवर निशाणा साधला. “राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केलं नसतं. सरकारच्या बाहेर बसणं पसंत केलं असतं. तुम्ही शरद पवारांसोबत सरकार केलं”, असं जयकुमार गोरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “शरद पवारांनी आजपर्यंत एकही गोष्ट विश्वासानं केलेली नाही. शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासानं वागले नाहीत. त्यांच्यासोबत जे कुणी गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला. काँग्रेस त्यांच्यासोबत गेली, काँग्रेसची काय अवस्था झाली तुम्ही बघत आहात. काँग्रेस कमी होती म्हणून की काय उद्धव ठाकरे गेले. पण उद्धव ठाकरे तर मोकळेच झाले”, अशी टीका गोरे यांनी केली आहे.

“शरद पवारांसोबत संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते? नवाब मलिक कुठे आहेत आज? अनिल देशमुख कुठे आहेत आज? जो राज्याचा गृहमंत्री सगळं पोलीस खातं चालवत होता, तो कधी आत गेला त्यालाही कळलं नाही”, असा टोला देखील जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये