पुणे

जेजुरीत ३४९ कोटींचा विकास आराखडा मंजूर

तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडा, अंतर्गत महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाद्वारे तीर्थक्षेत्र श्री कडेपठार मंदिर पायरी मार्गाच्या कामाचे भूमिपूजन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्याचे आयोजन श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी तसेच महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाद्वारे करण्यात आले होते.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुमारे ३४९ कोटी रुपये खर्चाचा तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडा मंजूर झाला असून यातील पहिल्या टप्प्यातील १०९ कोटी खर्चाची विकास कामे सुरू आहे. जेजुरी गड, ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव, लवथलेश्वर मंदिर आदींची कामे वेगाने सुरू असून पुरातत्व विभागाच्या वतीने कडेपठार खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाच्या जीर्णोद्धार कामास प्रारंभ करण्यात आला आहे. आमदार संजय जगताप यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी त्यांच्या भाषणात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत कडेपठार मंदिर जीर्णोद्धारासाठी सर्वतोपरी सहकार्य कारण्याचे यावेळी आश्वासन दिले तसेच प्रसंगी गरज भासल्यास वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी देखील शासन दरबारी आपण पाठपुरावा करू असे सांगून यावेळी त्यांनी न्यासाने सुचविलेल्या सर्व कामांची माहिती घेऊन विकासकामे करताना त्याची नोंद घेण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांना दिले.


यावेळी न्यासातर्फे समन्वयक मंगेश जेजुरीकर यांनी कडेपठारावरील पायर्यांचा इतिहास आणि तात्कालिन विश्वस्तांनी त्यासाठी केलेले परिश्रम यांस उजाळा दिला आणि न्यासाचे सद्यस्थितीतील विकास कामांची माहिती देऊन कडेपठार विकास आराखडा राबविताना वास्तूशास्त्र, दर्शन रांग, पाण्याची आणि स्वच्छतागृहांच्या सुविधांचा समावेश करण्यात अशी मागणी केली.


यावेळी न्यासातर्फे विश्वस्त वाल्मिक लांघी, म्हाळसाकांत आगलावे, रामचंद्र दिडभाई,माजी नगरसेवक सचिन सोनावणे, समस्त खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, उपाध्यक्ष किसान कुदळे, सचिव छबन कुदळे, श्री जानाई देवी मंडळाचे सुधिर गोडसे, माजी नगरसेवक हेमंत सोनावणे, अजिंक्य देशमुख, बाळासाहेब सातभाई, गणेश शिंदे, महेश दरेकर, उद्योजक रविंद्र जोशी, संतोष आबा खोमणे, एन.डि.जगताप,अनिल पोकळे, उमेश गायकवाड, माजी.विश्वस्त पंकज निकुडे, ईश्वर दरेकर, प्रविण जगताप, रसिक जोशी, मयूर दिडभाई, वैभव लांघी, दादा मुलानी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये