ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“गर्दीतून महिलांना सन्मानानं…”, जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत!

मुंबई | Jitendra Awhad – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच चर्चेत आले होते. भाजपच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारावरून राज्यातील राजकीय वातावरण चागलंच तापलं होतं. तसंच विनयभंगाच्या आरोपानंतर आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणाही केली होती. दरम्यान, आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस (International Men’s Day) साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं असून सध्या ते चांगलंच चर्चेत आहे.

“काबाडकष्ट करत मुलांना घडवतो तो..स्वत: उपाशी राहत इतरांना भरवतो तो..हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो..हलाखीचे दिवस काढत इतरांचं स्वप्न पूर्ण करतो तो..आणि गर्दीतून महिलांना सन्मानानं वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरूष”, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाडांवर नेमका काय आरोप केला होता?

“मी एकनाथ शिंदेंना भेटायला जात असताना समोरून आमदार जितेंद्र आव्हाड आले. स्थानिक आमदार असल्यानं मी त्यांना पाहून स्मितहास्य केलं. तेव्हा त्यांनी ‘तू इथं काय करतेस’ म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटलं”, असा आरोप रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाडांवर केला होता. या आरोपानंतर आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा गुन्हा खोट असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये