“जितेंद्र आव्हाडांवरचा गुन्हा सिद्ध नाही झाला तर…”; आव्हाडांच्या पत्नीचा थेट प्रशासनाला इशारा

मुंबई : (Ruta Awhad On Jitendra Awhad) जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाच्या गुन्ह्यावरून राज्यात राजकीय वातवरण चांगलचं तापलेलं दिसत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सरकारवर खोटे गुन्हे दाखल करून सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी थेट पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे. (jitendra awhad news, Mumbra Police)
जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाचा गुन्हा सिद्ध झाला नाही तर आम्ही पोलिसांविरोधात न्यायालयात जाणार” असा इशारा ऋता आव्हाडांनी केला आहे. ऋता आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाडांवर विनय भंगाचा आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. खोटे आरोप करून महिलेने आव्हाडांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
“जर तुम्हाला वाटत असेल मला कोणीही स्पर्श करू नये. तर तशा राजकीय रॅलींमध्ये सहभागी होऊच नका. आम्ही एक स्क्रीन लावणार आहोत सर्व ठिकाणी. ज्यातून लोकांना कळेल त्यांचा आमदार किती बाईलवेडा आहे. कसा हजारो लोकांमध्ये तो एखाद्या बाईचा विनयभंग करत असतो. जर आव्हाडांवरील गुन्हा सिद्ध झाला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत.” असंही ऋता यांनी म्हटलं आहे.