पिंपरी चिंचवड

डेंग्यू मुक्त शहर अभियानात सहभागी व्हा!

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या डेंग्यू रुग्णाचे प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या डेंग्यूला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी डेंग्यू मुक्त शहर अभियानाची घोषणा केली असून या अभियानात आकुर्डी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानचे इखलास सय्यद आणि तौहिद जावेद शेख यांनी केले आहे.

शहराला डेंग्यू मुक्त करण्याची जबाबदारी फक्त पालिकेची नसून आपल्या सर्व नागरिकांची आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी आवाहन केले प्रमाणे आठवड्यातून एक दिवस एक तास, डेंग्यू मुक्त पीसीएमसी मोहिमेला देऊ साथ या अभियानांतर्गत दर रविवारी सकाळी ९ ते १० यावेळेत प्रत्येक नागरिकांनी जबाबदार नागरिक या नात्याने आपले घर व आजूबाजूच्या परिसरातील सर्व डास उत्पत्ती ठिकाणे नष्ट करायची आहेत.

डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात तयार होत असल्याने घरातील शोभेच्या कुंडया, फ्रीज मधील ट्रे, कुलर मधील ट्रे, पाणी साठवण्याचे ड्रम, बॅलर यांची पाहणी करणे तसेच टेरेस वरील अडगळीचे साहित्य, घराच्या आजूबाजूला असलेला भंगार साहित्य, नारळाच्या करवनट्या, गाड्यांचे टायर यांची योग्य ती विल्हेवाट लावणे अशा प्रकारचे सामाजिक कार्य करण्यासाठी नागरिकांनी दर रविवारी एक तास स्वतःसाठी स्वतः च्या कुटुंबासाठी व समाजासाठी द्यावा असे आवाहन दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे..

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये