वाढदिवसानिमित्त जोपासली सामाजिक बांधीलकी

पुणे : मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी महाविद्यालय आवारात वृक्षारोपण करून ससून रुग्णालयातील लहान मुलांच्या सोपोश संस्थेला धनादेश दिला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला, तसेच महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून त्याचे जतन करण्याची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सतीश गायकवाड यांनी केले होते.
यावेळी मिसेस इंडिया गौरीताई नाईक, माजी नगरसेवक योगेश समेळ, जनता सहकारी बँकेचे संचालक किशोर शहा, आरपीआय (आ) गटाचे मातंग आघाडी नेते हनुमंत साठे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष नीलेश आल्हाट, कॅम्प गुरुनानक गुरु दरबार अध्यक्ष चरणजितसिंग सहानी, रामलिंग वेअर हाऊस उद्योजक सुनील महाजन, सिनेअभिनेत्री उज्ज्वला गौड, उद्योजक नितीन परदेशी, बांधकाम व्यावसायिक शरद अडूकिया, कसबा छप्परबंद समाजाचे अध्यक्ष हुसेन शेख, शब्बीर तांबोळी, आरपीआयचे नेते सोनू निकाळजे, रामायण मित्रमंडळाचे अध्यक्ष कैलास पिसाळ, भाजप ज्येष्ठ नेते पोपटराव गायकवाड, पुरुषोत्तम पिल्ले, शैलेश बडदे, पांडुरंग कांबळे आदी उपस्थित होते.