जान्हवीचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार; अभिनेत्रीने केली नवीन चित्रपटाची घोषणा
NTR 3 : अभिनेत्री जान्हवी कपुरची (Janhvi Kapoor) लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता ती तिच्या अभिनयाची जादू ही साऊथ इंडस्ट्रीमध्येही पसरवण्यासाठी तयार आहे. तिनं नुकतच तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केलं होतं ज्यात तिनं तिच्या साऊथ इंडस्ट्रीत पदार्पणाची घोषणा केली होती.
जान्हवी कपूर हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ती लवकरच साऊथ चित्रपटामध्ये डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी जान्हवी कपूर म्हणाली की, माझे खूप मोठे स्वप्न पूर्ण होत आहेत. यासाठी मी देवाकडे खूप जास्त प्रार्थना केल्या. ज्युनियर एनटीआर (Junior NTR) सोबत काम करण्याचे माझे स्वप्न होते आणि आता हे पूर्ण होत आहे. मी आता सध्या फक्त आणि फक्त दिवस मोजत आहे. मी ज्यूनिअर एनटीआरसोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे.
‘NTR 3’ च्या निर्मात्यांनीही जान्हवी कपूर दिग्दर्शक कोराताला शिवच्या आगामी चित्रपटात दक्षिण सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. Jr NTR च्या बहुप्रतिक्षित NTR 3 सिनेमाची सर्वांना उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून होतीच मात्र आता जान्हवीचे चाहतेही या चित्रपटसाठी उत्सुक आहेत.