राष्ट्रसंचार कनेक्टविश्लेषणसंपादकीय

आनंदाने जगण्यासाठी फक्त एवढेच करा…

राष्ट्रसंचार कनेक्ट

– फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडो वर्षांपासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारून काही घडणार नाही.
– या जगात आपले काहीच नाही. त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करू नका. मी अमुक, मी तमुक असा अहंकार बाळगू नका.
सर्वांशी प्रेमाने राहा.
– स्वतःचा भरवसा नसताना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका
– इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करू नका. त्यांचे जीवन ते जगले. तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या.
– आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे ते ओळखा. उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका.
– हजारो प्रकारचे संकट घोंघावत असताना, क्षुल्लक गोष्टींनी विचलित होऊ नका. जीवन गमतीने जगा!
– जरा मोकळेपणाने हसा. इतरांनाही आनंदी करा. लक्षात ठेवा, तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. सा़र्‍या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करू नका.
– लहानसहान गोष्टींचा आनंद घ्या. सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला. त्यामध्ये कमीपणा मानू नका. तुम्ही स्वतःला काहीही समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात.
– कुणाचाही द्वेष करू नका. सूडबुद्धीने वागू नका.
– आपल्या अवतीभवतीचे जग बघा. किती गंमत आहे हिरवागार निसर्ग तुम्हाला खुणावत आहे. चोहीकडे मुंग्यांची रांग बघा. पाखरांचे थवे बघा. बघा कावळ्याची स्वच्छता, खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणार्‍या लाटा तुम्हाला खुणावत आहेत.
– जा उंच डोंगरावर! किती प्रेमाने तो डोंगर खांद्यावर खेळवतो. विचारा त्या कोकिळेला, इतकी सुंदर कशी गातेस?
– विविध रंगांची फुले बघा. आयुष्यात विविध रंग भरा. एकसारखे जीवन जगू नका.
– नवी ठिकाणे, नवी माणसे यांच्याशी मैत्री करा. निसर्गाच्या सान्निध्यात जा. देवदर्शन करा. नातेवाइकांना वेळ द्या, प्राण्यांशी संपर्क ठेवा, त्यांचे जगणे बघा. कटकटी कमी करा. अधिक आनंदी जगा!
आनंदाने जगण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये