ताज्या बातम्यामनोरंजन

“आता तू रिटायर हो अन्…”, कंगनाचं करण जोहरवर टीकास्त्र

मुंबई | Kangana Ranaut – बाॅलिवूडची क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. तसंच कंगना नेहमी कोणत्याही विषयावर तिचं रोखठोक मत मांडताना दिसते. आता तिनं निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरवर (Karan Johar) निशाणा साधला आहे.

नुकताच करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यावरून कंगनानं करण जौहरवर टीका केली आहे. करण हा डेली सोपसारखे चित्रपट बनवतो, अशी टीका कंगनानं केली आहे.

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी शेअर करत तिनं लिहीलं आहे की, “न्युक्लिअर वेपन आणि अणुविज्ञानावर आधारित असणारे 3 तासांचे चित्रपट भारतीय प्रेक्षक पाहत आहेत. मात्र, ही नेपो गँग सास बहू का रोना दाखवत आहे. एक डेली सोप बनवण्यासाठी 250 कोटी लागतात?”, असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे.

“करण स्वत:ला भारतीय चित्रपटसृष्टीचा ध्वजवाहक म्हणवून घेतो आणि सतत मागे पडतो. आता एवढे पैसे वाया घालवू नको रिटायर हो आणि तरूण चित्रपट निर्मात्यांना नवीन चित्रपट बनवू देत”, असा सल्लाही कंगनानं करणला दिला.

image 5 3

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये