करीना कपूर खान तिसऱ्यांदा गरोदर? ‘तो’ फोटो होतोय व्हायरल

मुंबई | Kareena Kapoor Khan Pregnant – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तसंच करीना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील करीना कपूरने पती सैफ अली खान, मुलं तैमुर आणि जेह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. पण अशातच करीनाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील गोंधळले आहेत. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोवरून करीना पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.
करीना कपूर व्हेकेशनला गेली असून तिच्यासोबत तिची बहीण करिश्मा कपूर आणि मैत्रीण अमृता अरोरा देखील आहे. या दोघींनीही सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यात सर्वजण व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. पण अशात करीनाचा एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती सैफ आणि एका व्यक्तीसोबत दिसत आहे.
करीनाच्या या फोटोमुळे तिचे चाहतेही गोंधळले आहेत. या फोटोमध्ये ब्लॅक टँक टॉपमध्ये करीना कपूरचा बेबी बंप दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर करीना पुन्हा एकदा गरोदार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यावर करीना किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.