“… यासाठी आम्हाला शक्ती मिळो,” फडणवीसांचं कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाला साकडं!
पंढरपूर : (Kartiki Ekadashi Mahapuja completed by Devendra Fadnavis) कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी शासकीय महापूजा पार पाडली. यावेळी त्यांनी परतीच्या पावसाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे काम माझ्याकडून पूर्णत्वास जावे यासाठी विठुरायाला साकडं घातलं.
दरम्यान फडणवीस म्हणाले, “विठ्ठल हा सामान्य माणसांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकर्यांचा देव आहे. या सर्वांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत, त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हाव, यासाठी आम्हाला काम करण्याची शक्ती मिळो” असं साकडं त्यांनी पूजेच्या वेळी विठ्ठलाकडं घातलं आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विठुरायाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत महापूजा करण्याचा मान औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यातील शिरोडचे रहिवासी उत्तमराव साळुंके आणि त्यांच्या पत्नी कलावती या दाम्पत्याला मिळाला होता. त्यानंतर फडणीसांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.