ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

“निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा”, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

नवी दिल्ली | Sharad Pawar – आज राष्ट्रवादी (NCP) पक्ष कोणाचा होणार? यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीदरम्यान शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) युक्तीवाद सादर केला जात आहे.

शरद पवार गटानं सुनावणीदरम्यान युक्तीवाद सादर केला आहे. शरद पवारांनी पक्षाची स्थापना केली आहे आहे. शरद पवार यांचं नेतृत्व मान्य असं पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे. शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे युक्तीवाद डावलता येणात नाहीत, असा दावा शरद पवार गटानं केला.

तर निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे (Election Commmission) शरद पवार गटानं केली आहे. तर एक गट बाहेर पडला आहे, पण मूळ पक्ष आमच्याकडेच आहे, असा दावा शरद पवार गटानं केला आहे. तर राज्यात आणि राज्याबाहेरही पक्ष कुणाचा आहे? हे सर्वांना माहिती आहे, असा दावाही शरद पवार गटानं केला आहे.

पक्षाच्या विरोधात अजित पवार गटाची भूमिका आहे. तर पक्षाची भूमिका अजित पवार गटानं पाळली नाही, असा युक्तीवाद शरद पवार गटानं केला. तसंच 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा शरद पवारांना आहे, असा दावाही शरद पवार गटाकडून करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये