धक्कादायक! दुसऱ्या धर्माच्या मुलावर प्रेम केलं म्हणून वडिलांनी मुलीला पाजलं विष
केरळ | केरळच्या कोचीमध्ये मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलावर प्रेम केल्याने एका वडिलांनी आपल्या 14 वर्षांच्या मुलीला मारहाण करत तिला किटक नाशक पाजले. गंभीर अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या उपचारा दरम्यान, मृत्यू झाला आहे.
एका वरिष्ठ अलुवा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या मुलीवर 29 ऑक्टोबरपासून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी तिचा मृत्यू झाला. ध्याकाळी मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाली. या नंतर वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, त्या मुलीच्या वडिलांना प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. मुलीच्या वडिलांनी मुलीला तिच्या 16 वर्षांच्या प्रियकरापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, मुलीने ते ऐकले नाही. दोघेही एकाच शाळेत शिकत होते. आपल्या मुलीने त्या मुलाशी संपर्क ठेऊ नये यासाठी वडिलांनी तिचा फोनही हिसकावून घेतला होता. तरी सुद्धा मुलीने नकार दिल्याने. चिडलेल्या वडिलांनी आधी तिला मारहाण केली. यानंतर रॉडने मारहाण केली. यात मुलगी गंभीर जखमी झाल्यावर तिला त्यांनी कीटकनाशक पिण्यास भाग पाडले.
पोलिसांनी सांगितले की, वडिलांवर सुरुवातीला खुनाचा प्रयत्न करणे आणि प्राणघातक शस्त्रे आणि इजा पोहोचवणे या गुन्ह्यांसाठी भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोबतच हत्येचे कलमही लावण्यात आले आहे.