तरीही राव आपल्याकडे खोट्या अट्रोसिटी केसेस टाकल्या जात नाहीत… केतकी चितळेची पोस्ट चर्चेत
मुंबई | मराठी सिनेसृष्टीतली कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून केतकी चितळेचं (Ketaki Chitale) नाव घेतलं जातं. अनेकदा ती राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावरुन तिचं मत मांडत असते. आता तिने अॅट्रॉसिटी कायद्यावर केलेली पोस्ट (Ketaki Chitale Post) चर्चेचा विषय ठरत आहे.
केतकी चितळेने पोस्त मध्ये काय लिहिले आहे?
केतकी चितळेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने लिहिलं आहे,”आता एका रुग्णालयातील डीनला, रुग्णालयातील स्वच्छतागृह साफ करा हे त्याची जात बघून सांगायचे तर आणि तरीही राव आपल्याकडे खोट्या अट्रोसिटी केसेस टाकल्या जात नाहीत.
नेमकं प्रकरण काय?
केतकी चितळेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या डीनला शौचालय साफ करायला लावल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant patil) यांनी हे कृत्य करण्यास डीनला भाग पाडलं असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच हेमंत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यासंदर्भात अभिनेत्री केतकी चितळेने खास पोस्ट शेअर केली आहे.