केतकी माटेगावकरच्या भावाने केली आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये म्हणाला…

Akshay Mategaonkar Suicide : मराठी सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिच्या चुलत भावाने पुण्यात सुसगाव (हिंजवडी) मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय माटेगावकर असं केतकीच्या आत्महत्या केलेल्या भावाचं नाव आहे. राहत्या ठिकाणी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेऊन अक्षयने जीवन संपवलं आहे.
आत्महत्या केल्यानंतर अक्षयने लिहिलेली सुसाईड नोट देखील समोर आली आहे. त्याने नोकरी मिळेल की नाही या भीतीने आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. अक्षय पुण्यातील नामांकित सिम्बायोसिस विद्यालयात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याने इंटर्नशिप पूर्ण केली होती. मात्र, इंटर्नशिपमध्ये तो चांगली कामगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याला नोकरी मिळेल की नाही याची भीती होती. त्याच भीतीने अक्षयने आत्महत्या करण्याएवढं टोकाचं पाऊल उचललं.
काय आहे सुसाईड नोट मध्ये ?
आत्महत्येपूर्वी पत्र ही शेवटची गोष्ट असेल मी लिहतोय. माझ्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे, मी तुमची माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले, पण मला ते जमले नाही. मी इंटर्नशिपमध्ये चांगली कामगिरी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिथेही मी खराब झालो. हे पाहिल्यावर मला माहित आहे की मी नोकरी मिळवू शकत नाही आणि हे तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. शिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही. आई बाबा आणि आकांक्षा, मला माफ करा. मी निघालो. तुमचा, अक्षय माटेगावकर.