ताज्या बातम्यामहाराष्ट्र

केतकी चितळे प्रकरण- पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर…

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हीनं शरद पवारांबाबत केलेली आक्षेपार्ह पोस्ट यापूर्वीच व्हायरलं झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तीने १८ जानेवारी २०२० रोजी पहिल्यांदा ही पोस्ट व्हायरल केली होती. सुरुवातीला या पोस्टला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं ती केतकीच्या माध्यमातून पुन्हा व्हायरल करण्यात आली आहे, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळं केतकीच्या मागे कोणी सूत्रधार आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, केतकी ही वादग्रस्त अभिनेत्री असून तिने यापूर्वीही पोस्ट करुन वाद ओढवून घेतले आहेत. नाशिकमध्येही शरद पवारांविरोधात एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये पवारांना बारामतीचे गांधी संबोधून त्यांच्याविरोधात नथुराम उभं करण्याचं म्हटलं होतं. त्यामुळं नाशिकमधील या पोस्टशी केतकीच्या पोस्टचा काही संबंध आहे का? हे शोधलं जात आहे. पवारांविरोधात समाजात द्वेष पेरण्यासाठी आत्ता जी वेळ साधली गेली आहे कारण सध्याचं वातावरण तणावपूर्ण आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये