ताज्या बातम्यामनोरंजन

खतरों के खिलाडी’ च्या तेराव्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक होणार सहभागी, शिव ठाकरेला टक्कर द्यायला येणार ‘हे’ 9 स्पर्धक

मुंबई | Khatron Ke Khiladi 13 Contestants List – बाॅलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) च्या नव्या पर्वाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. तसंच आता या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. तर आता या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार असून नुकतीच त्यांची नावं समोर आली आहेत.

‘खतरों के खिलाडी 13’साठी (Khatron Ke Khiladi 13) स्पर्धकांची निवड करण्यासाठी रोहित शेट्टी ‘बिग बाॅस’च्या (Bigg Boss) घरात गेला होता. त्यावेळी त्यानं शिव ठाकरेला (Shiv Thakare) खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली होती. त्यामुळे आता शिव ठाकरे या पर्वात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय.

अर्चना गौतम (Archana Gautam) – शिव ठाकरेसोबत अर्चना गौतम देखील खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अर्चनानं रोहित शेट्टीला आपल्या खेळीनं वेड लावलं आहे. त्यामुळे ती या पर्वात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.

उर्फी जावेद (Urfi Javed) – उर्फी जावेद ही आपल्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तसंच उर्फी आत्तापर्यंत ‘बिग बॉस ओटीटी’, ‘स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली होती. तसंच आता ती ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वात सहभागी होणार आहे.

मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) – ‘लॉकअप’च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलेला मुनव्वर फारुकी देखील ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

नकुल मेहता आणि दिशा परमार’ (Nakul Mehta And Disha Parmar) – बडे अच्छे लगते है 2′ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे नकुल मेहता आणि दिशा परमार हे दोघंही ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणार आहेत.

सुम्बुल तौकीर खान, प्रियंका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता (Sumbul Touqeer Khan, Priyanka Chaudhary And Ankit Gupta) – शिव ठाकरेसह ‘बिग बॉस 16’चे आणखी तीन स्पर्धक ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वात सहभागी होणार आहेत. यामध्ये सुम्बुल तौकीर खान, प्रियंका चौधरी आणि अंकित गुप्ता या स्पर्धकांच्या नावांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये