पुणे

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीने चिरडल्याची घटना समोर येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंब येथे हा अपघात झाला.दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ओम सुनिल भालेराव (वय १९) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, रविवारी (दि २३ जून) मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा- ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मागे

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारने धडक दिली.अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये