ताज्या बातम्यामनोरंजन

“तो फक्त 2 तास…”, कियारा अडवाणीनं सांगितली सुशांत सिंह राजपूतची ‘ती’ खास सवय

मुंबई | Sushant Singh Rajput – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. तसंच सुशांतचे चाहते आजही त्याला विसरू शकलेले नाहीयेत. अशातच आज (21 जानेवारी) सुशांतचा वाढदिवस (Sushant Singh Rajput Birthday) आहे. या पार्श्वभीमीवर बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी सुशांतसोबतच्या (Sushant Singh Rajput) आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीनं (Kiara Advani) सुशांतच्या एका खास सवयीचा खुलासा केला आहे.

कियारा अडवाणीनं सुशांतसोबत (Sushant Singh Rajput) ‘एमएस धोनी’ (MS Dhoni) या चित्रपटात काम केलं आहे. तसंच तिनं युट्यूबच्या ‘बियर बायसेप’ या चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिनं सुशांतच्या सवयीबद्दल सांगितलं आहे. सुशांतला 2 तास झोप पुरते, मुळात याबाबतीत त्याचं मत वेगळं होतं, असं कियारानं सांगितलं आहे.

कियारा म्हणाली की, “सुशांत थोडासा इन्सोम्नियाक (निद्रानाश असलेलं) व्यक्ती होता. शूटिंग झाल्यानंतर मी प्रचंड थकायचे आणि मली कधी एकदा झोपते असं व्हायचं. पण, याबाबतीत सुशांतचं मत वेगळं होतं. तो म्हणायचा की, मानवी शरीराला फक्त 2 तास झोप पुरेशी असते. जेव्हा तुम्ही 7 ते 8 तास झोपता तेव्हासुद्धा तुम्ही जागेच असता. वास्तविक पाहता तुमचा मेंदू 7 ते 8 तासांपैकी फक्त 2 तासच शांत झोपलेला असतो. बाकीचे तास जरी तुम्ही झोपलेले असाल तरी तुमचा मेंदू कार्यरत असतो, असं त्यानं मला सांगितलं होतं.”

“फक्त 2 तास झोपही सुशांतला पुरेशी असायची, हे ऐकून मला आश्चर्य वाटायचं. पण दोन तास झोपूनही तो दुसऱ्या दिवशी तेवढाच उत्साही असायचा. तो सेटवर अजिबात कंटाळलेला नसायचा. माझ्यासाठी ही खूपच चकित करणारी गोष्ट होती”, असं कियारानं सांगितलं.

दरम्यान, सुशांतनं 14 जून 2020 रोजी बांद्रा येथील स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सीबीआय त्याच्या मृत्यूची चौकशी अजूनही करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये