ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विलासरावांच्या जन्मभूमीत सुप्रिया सुळे, जागवल्या आठवणी; म्हणाल्या, “आज ते आपल्यात नाहीत पण…”

Latur News | आज (30 सप्टेंबर) किल्लारी भूकंपाला (Killari Earthquake) 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1993 मध्ये हा मोठा भूकंप झाला होता. या भूकंपानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी तातडीनं पुनर्वसन केलं होतं. त्यानिमित्त आज किल्लारीत शरद पवारांबाबत कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि तत्कालीन मंत्री पद्मसिंह पाटील (Padmsinh Patil) यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुंबई बॉम्बस्फोट आणि किल्लारी भूकंप या दोन घटनांबद्दल माझ्या आणि माझ्या आईच्या मनात कायम अस्वस्थता असते. मी सलग दोन आठवडे किल्लारी परिसरात राहिले होत. तेव्हा सतत भूकंपाच्या बातम्या येत होत्या. त्यावेळी मोबाईल आणि इतर संपर्काची साधनं उपलब्ध नव्हती, त्यामुळे कोण कुठं आहे हे कळत नव्हतं.

आज विलासराव देशमुख व्यासपीठावर नाहीत याचं मला दु:ख वाटतं. कारण किल्लारी भूकंपावेळी विलासराव देशमुख यांनी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. त्यामुळे त्यांचं काम उभा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. ते अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला विचारा की काँग्रेसच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळाले, तर सर्वजण विलासराव देशमुख यांचंच नाव घेतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, पद्मसिंह पाटील यांना देखील आजच्या कृतज्ञता सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण त्यांना आज या सोहळ्याला येता आलं नाही. पण त्यांनी केलेल्या कामाचीही नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीच जे काम केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये