“अनिल परबांचं रिसाॅर्ट 90 दिवसांत…”, किरीट सोमय्यांचा इशारा
मुंबई | Kirit Somaiya – भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे. दापोलीतील रिसाॅर्ट अनिल परब यांच्या मालकीचं असून त्याच्या जमीन खरेदी व बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यादरम्यान, हे रिसाॅर्ट आता 90 दिवसांच्या आत पाडण्यात येईल, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
“अनिल परब यांचं दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यात येईल. यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात ठेकेदाराची नियुक्ती होईल. 90 दिवसांत अनिल परब यांचं साई रिसॉर्ट पाडण्यात येईल”, असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
दरम्यान, दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचं असून त्याच्या जमीन खरेदी व बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसंच या रिसॉर्टच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै 2018 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात केला होता. या रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज करतानाच त्यांनी घरपट्टीही भरली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.