सोमय्यांचा ठाकरेंवर आणखी एक बॉम्ब

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवालाकिंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले आहे, याची माहिती जनतेला द्यावी, असे भाजपनेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. यावेळी त्यांनी नंदकिशोर चतुर्वैदी यांच्या कंपन्यांची यादी समोर आल्याचे सांगत चतुर्वेदींना फरार घोषित करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपन्या एकाच पत्त्यावर रजिस्टर असून, हेच चतुर्वेदी गायब आहेत, त्यामुळे त्यांना फरार घोषित करावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. लवकरच किरीट सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून मीरा-भाईंदर महापालिकेसह राज्यातील इतर भागात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांचा सहभाग आहे, असे आरोप संजय राऊतांनी केले आहेत.


चतुर्वेदीचे ठाकरेंसोबत आर्थिक व्यवहार असून, आदित्य, तेजस ठाकरे यांच्याबरोबर चतुर्वेदीचे अनेक व्यवहार असल्याचेही आरोप यावेळी सोमय्या यांनी केले असून, नंदकिशोर चतुर्वेदींबाबत मुख्यमंत्री ठाकरे गप्प का? असा सवालदेखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्याची श्रीजी होम कंपनी असून, या कंपनीशी आपला संबंध काय, हेदेखील ठाकरे यांनी सांगण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. श्रीजी होम कंपनीत २९ कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा झाल्याचेही यावेळी सोमय्या यांनी माध्यमांसमोर सांगितले. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.


यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले की, माझ्याविरोधात आरोप करणारे प्रवीण कलमे कुठे आहेत? असे म्हणत याची माहिती जितेंद्र आव्हाड देणार का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आरोप करणारे कलमे भारतात आहेत की परदेशात हेही सांगावे, असे म्हटले आहे. कलमे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली? अनिल परब यांनी मदत केली की उद्धव ठाकरे यांनी मदत केली? असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी केले असून, कलमे यांनादेखील फरार घोषित केले जावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. सोमय्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आरोप करणारे राऊत जेव्हा या सर्व प्रकरणात पुरावे देतील तेव्हाच आपण उत्तर देऊ, असे सोमय्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

admin: