ताज्या बातम्या

Video : कोल्हापूरात रिक्षाचालकाची बाईकला धडक; अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात कल्याणी नगर येथे एका पोर्श कारने दोन जणांना उडवल्याची घटना घडली होती. यामध्ये एक तरुण व तरुणीचा मृत्यू झाला. अशीच एक अपघाताची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.

कोल्हापूरच्या शहापुरीमधल्या पत्की हॉस्पिटलजवळ रिक्षा चालकाने पाच जणांना धडक दिल्याचा प्रकार उघडीस आला आहे. क्षाचालक यू-टर्न घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याची बाईकस्वाराला धडक बसली. त्यानंतर रिक्षानं पुन्हा गिरकी घेतली आणि पुन्हा दोघांना उडवलं. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये रिक्षाचालक रिक्षा वळवताना दिसत आहेत. यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकी रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती या धडकेमुळे बाईकस्वार खाली पडला व मागे बसलेली महिला थेट रिक्षावर जाऊन आदळली. तर दुसरीकडे या धडकेमुळे रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो ड्रायव्हिंग सीटच्या उजव्या बाजूने खाली पडला.

चालक खाली पडल्यावर रिक्षानं त्या वेगात पुन्हा गिरकी घेतली आणि मागून येणारी एक महिला आणि एका पुरुषाच्या अंगावर रिक्षा गेली. त्यांना खाली पाडल्यानंतर रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये शिरली आणि सरतेशेवटी थांबली. या सर्व घटनाक्रमात बाईकवर बसलेले दोघे, स्वत: रिक्षाचालक आणि मागून येणारे दोघे असे तीन पुरुष आणि दोन महिला जखमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये