गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फसणारी घटना! शिक्षकानेच दाखवले विद्यार्थीनींना पॉर्न व्हिडीओ

कोल्हापूर : (Kolhapur Crime News) शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) एका शाळेमध्ये घडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील विद्यालंकार शाळेत इंग्रजी विषयाचा शिक्षक व्ही.पी. बांगडी याने शाळेतील नववी आणि दहावीच्या वर्गातील मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
इंग्रजी विषयाचा शिक्षक असलेल्या विकृत बांगडीने शाळेतील नववी आणि दहावीच्या मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवला. यानंतर या शिक्षकाची साताऱ्यामध्ये बदली करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांमधून तसेच पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून केली जात आहे.
गेल्या दोन वर्षापासून शिक्षक बांगडीने हे असे प्रकार केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनींनी केला आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित विद्यार्थ्यांनी केली आहे. असा प्रकार शाळेमध्येच घडल्याने आता पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित विद्यार्थीनींकडून करण्यात आली आहे.