कोल्हापूर | Kolhapur Gram Panchayat Election Result 2022 – कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झालं आहे. सतेज पाटील गटाला महाडिक गटानं मोठा धक्का दिला आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटानं सत्ता खेचत तब्बल 18 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत. तसंच सरपंचपदासाठी पद्मजा कृष्णात करपे या 4 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
शिरोली ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी आणि विरोधी महाडिक आघाडी अशी लढत होत आहे. शाहू आघाडीकडून सरपंचपदासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य रूपाली खवरे, तर महाडिक आघाडीकडून पद्मजा करपे रिंगणात होत्या. तसंच महाडिक आघाडीनं ग्रामपंचायतमधील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
शिरोली ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक व ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांचं हे होम ग्राऊंड आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाडिक आघाडीकडून शाहू आघाडीनं सत्ता हस्तगत केली होती.