कोल्हापूरात हजारो दूध संस्था कारवाईच्या उंबरठ्यावर? ५० लिटरपेक्षा कमी संकलन करणाऱ्या संस्थाना ब्रेक..
कोल्हापूर : (Kolhapur Milk Company News) जिल्ह्यात दुध संस्थांचे जाळे मोठे असल्याने २ हजारांहून अधिक दूध संस्था दूध संकलन करतात. दरम्यान दुग्ध विभागाने मागच्या दोन महिन्यांपूर्वी ५० लिटरपेक्षा कमी संकलन असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचा आदेश जारी केला होता. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १४५० दूध संस्थांना नोटीसा प्राप्त झाल्या आहेत.
यामुळे दूध संस्थांच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आपली संस्था बंद होणार या भितीने काही संस्थाचालक यातून बचाव करण्यासाठी संस्था चालकांनी विविध क्लुप्त्या करत दूध संकलन वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
मागच्या काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचा पदभार हातात घेता धडक मोहिम राबवली आहे. मुंढे यांनी ५० लिटर दूध संकलन करणार्या संस्था बंदच करा, असे आदेश काढले आहेत. जर कार्यवाही झाली नाही तर अधिकार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिल्याने अधिकारी वर्ग चांगलाच कामाला लागला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजारापेक्षाही जास्त दूध संस्था आहेत. यातील जवळपास २ हजार संस्थांमध्ये ५० ते ७० लिटरच दूध संकलन होते. मिळालेल्या सर्व्हेनुसार कमी संकलन व बंद संस्था अवसायनात काढण्यासाठी दुग्ध विभागाचे तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत; पण हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया पुढे जात नसल्याचे चित्र आहे. आता कमी संकलन व बंद असणार्या १४५० दूध संस्था अवसायानात काढून त्या बंद करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे काम दुग्ध विभागाकडून सुरु आहे मिळत आहे.