ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरकरांचा कौतुकास्पद निर्णय! शहिद जवान प्रशांत जाधवांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम

कोल्हापूर | Prashant Jadhav | लडाखमधील (Ladakh) तुर्तक सेक्टरमध्ये खासगी बसला अपघात (Bus Accident) होऊन कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंगल्ज तालुक्यातील बसर्गे (Baserge) बुद्रुकमधील प्रशांत शिवाजी जाधव (Prashant Jadhav) यांना वीरमरण आले. तसंच आज प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी बसर्गेमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil), जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhavar) उपस्थित होते. (Prashant Jadhav)

अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या अलोट जनसागराने पुष्पवृष्टी करत प्रशांत जाधव यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली. दरम्यान, शहीद प्रशांत जाधव आणि सातारचे शहीद सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (Vijay Sarjerao Shinde) यांच्या कुटूंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी रु.१ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोशल मीडियातून दिली आहे.

तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (Herwad) गावाने विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे अनुकरण अनेक गावांमध्ये करण्यात येत आहे. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या बसर्गे गावामध्येही त्यांच्या अंत्यसंस्कारापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रशांत जाधव यांच्या पत्नी पद्मा यांचं कुंकू कायम राहिलं आहे. 

दरम्यान, शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पश्चात पत्नी पद्मा, अवघ्या ११ महिन्यांची कन्या नियती, वडिल शिवाजी आणि आई रेणुका असा परिवार आहे. प्रशांत आठ वर्षांपूर्वीच म्हणजेच २०१४ मध्ये बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. त्यांचा पद्मा यांच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये