ताज्या बातम्यामनोरंजन

कोण होणार करोडपती’चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | ‘कोण होणार करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर कोट्यधीश होण्याची अनोखी संधी सामान्य नागरिकांना या कार्यक्रमातून मिळते. या जगद्विख्यात कार्यक्रमाच्या येणाऱ्या पर्वामध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरू होते आहे. या वर्षी स्पर्धकांना 1 मिस्डकॉल देऊन दोन करोड रुपये जिंकण्याची संधी आहे!

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन या वर्षीही प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. सचिन खेडेकर उत्तम अभिनेते आहेतच, पण स्पर्धेतल्या स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं कामही ते मोठ्या कौशल्यानी करतात. त्यामुळे स्पर्धेतले सहभागी स्पर्धक अधिक आत्मविश्वासानी आणि चांगल्या प्रकारे खेळू शकतात.

या वर्षी सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्पर्धकांना 14 दिवसांत 14 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधी देखील आहेत. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 2 मार्चपासून नोंदणी सुरू होते आहे. 2 ते 15 मार्चपर्यंत रोज एक प्रश्न, असे 14 प्रश्न विचारले जाणार आहेत. 7039077772 या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षकांना नोंदणी करता येईल. सोनी मराठी वाहिनीने कोण होणार करोडपती या कार्यक्रमाद्वारे 1 मिस्डकॉल देऊन 2 करोड जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये