माजी खासदार वंदना चव्हाण यांनी जाणून घेतल्या समस्या
मोनोरेल प्रकल्पामुळे झाडांची कत्तल
मोनोरेल प्रकल्पामुळे झाडांची कत्तल
कोथरूड | कोथरूडमधील ऑक्सिजन हब अशी ओळख असणाऱ्या थोरात उद्यान या ठिकाणी पुणे मनपाने मोनोरेल प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पामुळे झाडांची कत्तल होणार आहे, अशी माहिती नागरिकांनी राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांना दिली.
या उद्यानामध्ये यांत्रिकीकरण होणार आहे, याचसह या ठिकाणी असणाऱ्या ४०७ मीटरचा ट्रॅक तयार होत असल्याने नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याचा धोका संभावत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या थोरात उद्यानामधील होणाऱ्या या यांत्रिकीकरण यामुळे नागरिकांना मोकळा श्वास घेणे दुरापास्त होत आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार,कोथरूड) चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी ॲड. वंदना चव्हाण यांच्याशी नागरिकांचे चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दुधाने यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यवाही करण्याचा वंदना चव्हाण यांचे आश्वासन
नागरिकांनी वंदना चव्हाण यांच्याकडे आपले प्रश्न उपस्थित करत कोणतीही मागणी नसताना आणि खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, मुलांसाठी खेळणी आणि पदपथ अशा सुविधा नव्याने विकसित केल्या असताना मोनोरेलचा घाट घालण्याचे बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच याप्रसंगी नागरिकांच्या बाजूने उभे राहत मनपाच्या आयुक्तांकडे पाठपुरावा करत हा प्रकल्प रोखण्यात यावा, अशी भूमिका नागरिकांनी मांडली. यावेळी वंदना चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर यावर कार्यवाही करण्याचा आणि साथ देण्याचा शब्द दिला.
उद्यान हवे, मोनोरेल नको – गिरीश गुरनानी
कोथरूड थोरात उद्यानात नागरिकांच्या इच्छेविरुद्ध मोनोरेल प्रकल्प बांधत आहे सरकार का आणि कशासाठी करत आहे ? दोन बोगीच्या या मोनोरेल मधे ४०७ मीटरचा ट्रॅक असणार आहे. यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होणार आहे.या प्रकल्पामुळे पर्यावरणीय नुकसान तर अटळ आहे…