“…म्हणून आई ऐवजी मीच माझ्या भावाला जन्म देण्याचा निर्णय घेतला”; ट्रोल झाल्यानंतर संतप्त महिलेने दिले उत्तर

साधारणपणे आपली आईच आपल्या मुलाला जन्म घालत असते मात्र, कॅनडा मधील एका महिलेने आपल्या भावालाच जन्म घालण्याचा निर्णय घेतला आहे. कायले असं नाव असलेल्या महिलेच्या पोटात तिच्या काकाचे मुल वाढत आहे. त्यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
कायले ही अगोदरच तीन मुलांची आई आहे. मात्र तिच्या काका-काकीला अनेक वर्षांपासून मुल होत नसल्याने ते दुःखी होते. त्याचं दुःख कायले पाहू शकत नव्हती त्यामुळे तिने घरच्यांसमोर एक प्रस्ताव मांडला. आपल्या काका – काकीच्या बाळाला ती स्वतः जन्म देऊ शकते असं तिने सांगितले. सरोगसीमार्फत ते शक्य असल्याचं तिने सांगितलं. सुरुवातीला घरच्यांनी मान्यता दिली नाही मात्र काही दिवसांनी कायलेच्या निस्वार्थ भावनेला पाहून सर्वजण तयार झाले. आणि कायले काका – काकीच्या बाळाची सरोगेट मदर झाली.
कायलेचा भाऊ सध्या तिच्या पोटात मोठा होत आहे. लवकरच ती आई सोबतच बहिण देखील होणार आहे. मात्र, कायलेने फक्त पैशांसाठी सरोगसी मदर होण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हणत लोकांनी तिला ट्रोल केलं. त्यामुळे ती खूप संतापली आणि ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, पैशांसाठी सरोगसी हे कायद्याने गुन्हा आहे. वैद्यकीय खर्च सोडून सरोगेट मदरला दुसरं काहीही घेण्याची परवानगी नाही. काही गरजू स्त्रिया तसंही करतात मात्र, मी आपल्या कुटुंबासाठी हे सगळं करत आहे. त्यात चुकीचं असं काहीच नाही. असं स्पष्टपणे कायलेने ट्रोल करणाऱ्यांना प्रतीउत्तर दिलं.