ललित पाटलानं ससून हॉस्पिटलममध्ये बसून ड्रग्जचे केले करार अन् दोन आठवड्यापासून विदेशात फरार …
Pune Drug :
ललित पाटील (lalit patil ) 2 ऑकटोबरला ससूनमधून अगदी निवांतपणे बाहेर पडला. नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन तो पुन्हा ससूनमधील कैद्यांसाठी असलेल्या कोठडीत परत येईल असं बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना वाटलं होतं. पण ससूनमधून अलगदपणे निसटणाऱ्या ललित पाटीलने सुसाट वेगानं नेपाळ बॉर्डर गाठली. ड्रग माफिया ललित पाटीलला पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार होऊन आज दोन आठवडे झाले.ड्रग रॅकेटचा उपयोग करून ललित पाटील परदेशात पळून गेल्याची शक्यता व्यक्त होतेय. कारण या आधी त्यानं मलेशिया, थायलंड आणि दुबईमध्ये मेफेड्रोन एस्कपोर्ट केल्याचं समोर आलं आहे .
ललित पती व त्याचा भाऊ भूषण पाटीलसह त्यानं दुबईला शेळ्या पाठ्वल्याच रेकॉर्ड उपलब्ध आहे. पण शेळ्यांच्या नावाखाली त्यानं मेफेड्रोन दुबईला पाठवल्याच पोलीस सूत्रांच म्हणणं आहे. त्याचबरोबर मलेशिया, थायलंड या इतर देशांमध्ये देखील ललित पाटीलने मेफेड्रोन पाठवलं होत आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच नेटवर्क तयार झालं. याच नेटवर्कचा उपयोग करून ललित पाटील भारताबाहेर पळाल्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी त्याची तपासणी करत असताना नाशिक एम आय डी सी मधील मेफेड्रोन तयार करणाऱ्या कारखान्याची पोलिसांनी तपासणी केली. दोघांच्या घरी जाऊन घरच्यांकडेही चौकशी करून झाली. पण ललिताचा थांगपत्ता लागत नाही.
ललित पाटील (lalit patil ) पळाला की त्याला पळवून लावलं हा प्रश्न तर पहिल्या दिवसापासून विचारला जातोय. कारण तो पकडला गेला तर एक नाही तर अनेकांचा बिंग फुटणार आहे . पुणे पोलीस दलातील नऊ कर्मचाऱ्यांना या आधीच या प्रकरणात निलंबित करण्यात आलयं तर ससूनच्या व्यवस्थापनाची चौकशी करणाऱ्या चार सदस्यीय चौकशी समितीने ललितवर उपचार करणाऱ्या सहा डॉक्तरांचे जबाब नोंद केलेत