कोथरूड मधील सोसायटीत जमीन खचून वीस फूट खड्डा

कोथरूड : वारजे कर्वेनगर (Varje Karvenagar, Kothrud) क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या गिरीजाशंकर विहार सोसायटीत (Girijashankar Vihar Society) सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अचानकपणे पंधरा ते वीस फूट खोल खड्डा पडला. जमीन खचल्याने हा खड्डा पडल्याचे दिसून आले.
सोसायटी धारकांची वर्दळ असलेल्या पार्किंगच्या एरियामध्ये हा खड्डा पडल्याने तो धोकादायक बनला होता रात्रीच्या अंधारात कोणीतरी यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता होती म्हणून तातडीने महापालिकेच्या यंत्रणे कडून हा खड्डा बुजवण्यात आला.ही जागा खचली असते लक्षात येताच तेथील नागरिकांनी समाजसेवक आणि उद्यम बँकेचे संचालक संदीप खर्डीकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने तेथे येऊन जागेची पाहणी केली आणि पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तसेच आयुक्त विक्रमकुमार यांच्या शी संपर्क केला.नंबर पाटील यांनी आदेश देऊन रात्रीच सर्व टीम तेथे पाठवली अग्निशामक दलाची गाडी देखील त्यांना झाली.

पो. नि. संगीता पाटील घटनास्थळी दाखल झाले. जवळच राहणारे आर्किटेक्ट प्रकाश कुलकर्णी, स्ट्रकचरलं इंजिनियर निंबाळकर यांनी देखील घटनास्थळी अधिकाऱयांना मार्गदर्शन केले. सर्वानुमते हा खड्डा RMC ने बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या खोल खड्ड्यातील गॅस पाईपलाईन व पाण्याची लाईन चे कामं करून (त्यावर उचलून ) इमारतीस धोका पोहोचू नये म्हणून काम करण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेऊन अवघ्या तीन तासात केलेल्या कार्यवाहीमुळे सोसायटी धारकातून समाधान व्यक्त करण्यात आले.