“माझा सलमान खानवर लहानपासून राग आहे, कधी ना कधी त्याचा अहंकार मोडणार” – लॉरेन्स बिश्नोई

मुंबई | गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने अभिनेता सलमान खानला धमकी दिली होती. बिश्नोई टोळीने सलमान खानची (Salman Khan) हत्या करण्यासाठी प्लॅनही तयार केला होता. आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला उघड उघड धमकी दिली आहे. सलमान खानचा अहंकार मोडणार, असा इशारा लॉरेन्स बिश्नोईने दिला आहे.
सिद्धूच्या आधीच लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला संपवण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी सतत तपास कार्य सुरु ठेवला आहे. पंजाबी रॅपर-गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.नुकतंच माध्यमांशी बोलताना लॉरेन्स बिष्णोईने धक्कादायक खुलासे केले आहेत.
लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं, “माझ्या समाजातील लोकांचा सलमान खानवर खूप राग आहे. त्याने कायम आमच्या समाजाला तुच्छ लेखलं. त्याच्यावर केस चालू आहे. पण, अद्यापही माफी मागितली नाही. आमच्या परिसरात प्राण्याचा जीव घेतला जात नाही. झाडं कापण्यास बंदी आहे. मात्र, जिथे बिश्नोई समाजाची संख्या जास्त आहे, तिथे येत सलमान खानने हरीणाची शिकार केली आहे.”
“माझा सलमान खानवर लहानपासून राग आहे. कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे. सलमान खानने बिश्नोई समाजातील लोकांना पैशांचं आमिष दाखवलं होतं. परंतु, सलमान खानला प्रसिद्धीसाठी नाहीतर हेतूच्या उद्देशाने मारणार आहोत,” असे बिश्नोईने म्हटल आहे.