ताज्या बातम्यामनोरंजन

लाॅरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला पुन्हा धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई | Salman Khan – बाॅलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खानला (Salman Khan) लाॅरेन्स बिश्नोईकडून (Lawrence Bishnoi) पुन्हा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे. तसंच याबाबत वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये लाॅरेन्स बिश्नोईसह तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शनिवारी (19 मार्च) दुपारी सलमान खानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर एक ई-मेल पाठवण्यात आला. त्या ई-मेलमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच, काही दिवसांपूर्वीच एबीपी सांझाचे संपादक जगविंदर पटियाल यांनी लॉरेन्सची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचा उल्लेख या ई-मेलमध्ये आढळला आहे.

“गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) तुमचा बॉस सलमान खानशी बोलायचं आहे. तुम्ही लाॅरेन्स बिश्नोईची मुलाखत पाहिलीच असेल. जर पाहिली नसेल, तर मला सांगा. हा मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा करायला हवी. आता वेळ आहे म्हणून सांगितलंय, पुढच्या वेळी झटका देणार”, असं सलमानला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. हा मेल रोहित गर्ग या आयडीवरुन पाठवण्यात आला आहे.

धमकीचा मेल आल्यानंतर सलमानच्या टीमनं पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 506 (2) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसंच सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये