नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा अव्वल फुटबॉलपटू कर्णधार लिओनेल मेस्सीने गुरुवारी आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. कतारमध्ये होणारा फिफा विश्वचषक २०२२ हा त्याच्या कारकिर्दितील शेवटचा विश्वचषक असेल. २००७ मध्ये मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने अर्जेंटिनासाठी ९० गोल केले आहेत आणि तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वोच्च ३ गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
पुढचा विश्वचषक २०२६ मध्ये खेळवला जाणार असल्याने लिओन मेस्सीनेही हे सांगितले. मेस्सी आता ३५ वर्षांचा आहे आणि २०२६ पर्यंत तो ३९ वर्षांचा होईल, तोपर्यंत त्याचा फिटनेस राखणे खूप कठीण असेल. ‘हा नक्कीच माझा शेवटचा विश्वचषक आहे,’ असे मेस्सीने सांगितले.