पुणे हादरलं! मेट्रोचे काम सुरू असताना सापडले जिवंत हॅन्ड ग्रेनेड
पुणे | Pune News : पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बाणेर (Baner) परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना जिवंत हॅन्ड ग्रेनेड (Hand Grenade) सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बाॅम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुण्यातील बाणेर परिसरात मेट्रोचे खोदकाम सुरू होते. बाणेरमधील आयशर कंपनीच्या आवारात मेट्रोसाठी खोदकाम सुरू होतं. हे खोदकाम सुरू असताना तिथे जिवंत हॅन्ड ग्रेनेड बॉम्ब सापडले आहेत. त्यामुळे बाणेर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर आता हे ग्रेनेड बॉम्ब शोध पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहेत.
दरम्यान, खोदकामादरम्यान जिवंत हॅन्ड ग्रेनेड सापडल्यामुळे बाणेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.