मुंबईत चालायचा लाईव्ह सेक्स शो; शूटिंग सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकत केले पाच जणांना अटक
Pihu App Live sex show news : मुंबईत (Mumbai Crime) लाइव्ह सेक्स शोचं प्रसारण चालू धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ‘पिहू’ नावाच्या मोबाईल अॅपवरून पैसे आकारून लाइव्ह सेक्स शोचं प्रसारण सुरु होते. या घटने अंतर्गत मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणा अंतर्गत पोलिसांनी दोन महिलेसह तिघांना अटक केली आहे. या घटनेतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांन देण्यात आली आहे.
वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक तरुणी (वय 20), एक महिला (वय 34) व एका तरुणाचा (वय 27) समावेश आहे. हे तिघे पॉर्न दृश्यांचं चित्रीकरण करून ते मोबाइल अॅपवर अपलोड करायचे.
दोन आठवड्यांपूर्वी अंधेरी पश्चिम इथं या अॅपसाठी मोठ्या प्रमाणावर शूटिंग करण्यात आलं होतं. एका स्थानिक व्यक्तीकडून पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. लाइव्ह शूटिंग सुरू असताना ह्या सगळ्यांना ताब्यात घ्यायचं असा प्लान पोलिसांनी आखला. त्यानुसार, रविवारी अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला भागातील एका एका बंगल्यात पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी तिघांना अटक करण्यात आली.
खेळ कसा चालायचा?
पिहू अॅपचा वापर करून पॉर्न कंटेट पाहणाऱ्या युजर्सना त्यांच्या इन्स्टाग्रामवर मेसेज करून लाइव्ह स्ट्रिमिंगच्या वेळा कळवल्या जायच्या. त्यानंतर युजर्सना इन-अॅप कॉइन खरेदी करायचे. ते रीडीम करून कंटेन्ट पाहता यायचा. अॅपसाठी काम करणाऱ्या महिला ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलची सेवा देखील युजर्सना पुरवायच्या, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
युजर्सकडून 7,500 रुपये नोंदणी शुल्क देखील घेतले जायचे. लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी आगाऊ पैसे द्यावे लागायचे आणि कॉल सेवेसाठी स्वतंत्र पैसे घेतले जायचे. हा व्यवहार डिजिटल स्वरूपात व्हायचा. एकदा ग्राहकांना अॅपचा अॅक्सेस मिळाला की त्यांना वेगवेगळ्या महिलांचा प्रोफाइल पाहता यायचा. या प्रोफाइलवर महिलांचे काही प्रमोशनल व्हिडिओ असायचे. ते पाहून युजर त्यांच्याशी संपर्क साधायचे. बहुतांश लाइव्ह स्ट्रिंमिंग कॉमेंट्रीसह असायची, अशी माहिती त्या पोलीस अधिकाऱ्यानं दिली. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आलं आहे.