पुणे पुन्हा हादरलं! अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

पुणे : (Madhu Markandeya Death sister of Bhagyashree Mote) मराठी मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. हा मृत्यु नसून हत्या असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहिण मधु मोटे यांचा मृत्यु झाला आहे. पुण्यातील वाकड याठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तातडीनं तपास सुरु केला आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री भाग्यश्रीला मोठा धक्का बसला आहे. तिच्या कुटुंबियांवर काळानं मोठा घाला घातला आहे. भाग्यश्रीच्या बहिणीच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुणाही दिसून आल्यानं संशय बळावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, मधु मार्केंडेय (मोटे) या त्यांच्या एका मैत्रीणीसोबत वाकड परिसरामध्ये केकचा बिझनेस करत होत्या. रविवारी मधु या त्यांच्या मैत्रीणीसोबत दिसून आल्या होत्या. त्या भाडेकरारावर घर घेण्यासाठी चौकशी करत होत्या. एका ठिकाणी घर पाहण्यासाठी गेले असताना त्यांना चक्कर आली. तेव्हा त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मधु यांच्या चेहऱ्यावर अनेक जखमा आहेत. अशावेळी त्यांचा मृत्यु संशस्यापद असल्याचे बोलले जात आहे. कुटुंबियांना अशी शंका आहे की या मृत्युमागे काही घातपात आहे. पोलिसांनी संबंधित घटनेची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. अभिनेत्री भाग्यश्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन त्यावर एक कॅप्शन लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.