ताज्या बातम्यामनोरंजन

माधुरी दीक्षित यांना भाजपकडून खासदारकीचे तिकीट?

नवी दिल्ली | काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची (lok Sabha Election) राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. उमेदवारांनी देखील मतदारसंघावर आपली दावेदारी दाखवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशातच आता धकधक गर्ल सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने (madhuri dixit) देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मात्र सध्या अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरु नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली.

यापूर्वी देखील अशीच चर्चा रंगली होती. पण सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही, असं म्हणत माधुरी दीक्षित यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरू नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. तसेच लोकसभेचचे तिकीट कोणाला द्यायचं हा सर्वस्वी निर्णय केंद्रातून होणार नाही. त्यामुळे आगामी काळात माधुरी दीक्षित कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये