महादेव ॲप बेटिंग प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात! नारायणगाव येथून 70 ते 80 जणांना अटक
नारायनगाव | भारतासह परदेशात महादेव बेटिंग एप प्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणाची पाळेमुळे पुण्यातील नारायणगाव इथंपर्यंत पोहोचल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत समोर आले आहे.
पोलिसांनी नारायणगाव येथील एका मोठ्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंध असणाऱ्या सुमारे 70 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
महादेव बेटिंग प्रकरण समोर आले तेव्हा देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती. आता याच प्रकरणी नारायणगावात पोलिसांनी कारवाई करत याचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आणले आहे.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या छापेमारीनंतर समोर आले की, या महादेव बेटिंगचे काम नारायणगावातील एका इमारतीमध्ये सुरु हाते. पोलिसांनी छापा टाकलेली संपूर्ण संपुर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरत असल्याची माहिती समार आली आहे. यावेळी पोलिसांनी या इमारतीत काम करणारे 70-80 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.