ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भाजप महागद्दार! “सत्ता गेल्यास शिंदे-पवार कुठे जातील, हे कळणारही नाही” महादेव जानकरांचा घणाघात

परभणी : (Mahadev Jankar On Devendra Fadnavis) भाजपप्रणित ‘एनडीए’ आघाडी (NDA Alliance) आम्हाला गृहित धरत नाही. काँग्रेस पक्ष (Congress) हा गद्दार, तर भाजप महागद्दार आहे, अशी टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी जनस्वराज्य यात्रेनिमित्त डागलं आहे.

माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत गेलेले सगळे लोक सत्ता गेल्यास कुठे जातील, हे कळणारही नाही. सामान्य जनता मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमवेत असल्याचे दिसते. मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. काँग्रेस पक्षाचे नेते शहाणपणाने वागले, तर त्यांना चांगले दिवस येतील.

हे सत्तेत येत नव्हते, तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती; त्यावेळी आमच्याशी युती करून मते मिळवून त्यांनी सत्ता हस्तगत केली. मात्र, नंतर सत्तेची घमेंड त्यांच्या डोक्यात शिरली. हि चूक त्यांची नाही, तर आमचीही आहे. जो तो त्यांचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

‘वापरा आणि फेकून द्या’ या सध्याच्या धोरणामुळे भाजप कधी संपून जाईल, हे सांगता येणार नाही. आम्ही ठरविले आहे. आता कुणाच्या मागे लागायचे नाही. ज्यांना गरज असेल ते स्वतःहून मागे येतील, असंही जानकर यांनी स्पष्ट केलं. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी हारुगडे, रासपचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील, बाळासाहेब मेटकरी, प्रणव हारुगडे, महेश मेटकरी, बबन हारूगडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये