ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

“यांना जर मस्ती चढली असेल तर…”, विभानसभेत जयंत पाटील आक्रमक

नागपूर | Winter Session 2022 – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra-Karnataka Border Dispute) राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच या सीमावादाचे पडसाद विधानसभेत उमटले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रस्ताव मांडला होता. यावर बोलताना जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जात आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

“जर यांना मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका,” असं जयंत पाटीलांनी राज्य सरकारला ठणकावून सांगितलं.

जयंत पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर झालेला हल्ल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. सीमाभागात काल मराठी बांधवांचं संमेलन भरवण्यात आलं होतं. कर्नाटक सरकारनं या संमेलनात महाराष्ट्रातील एकही नेता पोहोचणार नाही अशी व्यवस्था केली होती. हसन मुश्रीफ तेथील मराठी माणसांच्या समर्थनासाठी तिथे पोहोचले असता त्यांच्यावर लाठी उगारली गेली. हे अत्यंत चुकीचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये