देवेंद्र फडणवीसांची पुष्पा स्टाईल; भर कार्यक्रमात गायलं ‘श्रीवल्ली’ गाणं
मुंबई | ‘पुष्पा’ या सिनेमातील ‘सामे सामे’ आणि ‘श्रीवल्ली’ ही दोन गाणी चांगलीच लोकप्रिय झाली. त्यातील श्रीवल्ली हे गाण जावेद अली याने गायलं आहे. विशेष म्हणजे हेच गाणं देवेंद्र फडणवीस यांनी जावेद अलीसमोर सादर केलं. जावेद अलीच्या एका फॅन पेजवर देवेंद्र फडणीस यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
एका खासगी पार्टीत जावेद अली हे गाणं गात असताना तिथे उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आणि त्यांच्यासमोर त्यांनी माइक धरला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याबरोबर साथ देत ‘श्रीवल्ली’ गण्याचं कडवं गाऊन दाखवलं.
भारतीय बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘पुष्पा’मधील हे गाणं रील्सच्या माध्यमातून चांगलंच व्हायरल झालं. मध्यंतरी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने एका सामन्यादरम्यान या गाण्यावर केलेलं नृत्य पाहून सगळेच थक्क झाले होते. देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.