ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

राज्यात परतीच्या पावसाचा कहर; पुढील ४८ तासात पुणे, मुंबईसह ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : राज्यांत गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला थैमान घातलं आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात पुणे, मुंबईसह अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर दिसून येत आहे. पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांसह जिल्ह्यांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.

आजही पुणे मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह पुण्यामध्ये वातावरण ढगाळ राहील. मुंबईच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या अनेक भागात काल (रविवारी) मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुण्यासह आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर दिसून आला.

यंदा मान्सूनमध्ये देशात सरासरीच्या 94 % पाऊस झाला आहे. तर राज्यात सरासरीच्या 97 टक्के पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, बीड या 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये