अनिल गायकवाड एमएसआरडीचे नवे व्यवस्थापकीय संचालक
मुंबई | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या खांदेपालटावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अनिल गायकवाड यांची नियुक्ती केली. वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरुन हटवले आहे. मोपलवार हे राज्यात चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोपलवार यांना पदावरुन हटवले आहे.
राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी मंडळाच्या प्रमुखपदाची सूत्रे आता राधेश्याम मोपलवार यांच्याकडून अनिल गायकवाड यांच्या हाती सोपवण्यात आली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे मुख्यंमंत्रीपदाच्या काळात मोपलवार यांना कायम स्थान मिळत होते. मंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी 2018 मधील निवृत्ती नंतरही रेकॉर्ड ब्रेक 7 वेळा आपली कालमर्यादा वाढवून घेतली होती.