क्राईमताज्या बातम्यापुणे
म्हातारचळ! पुण्यात ७० वर्षीय वृद्धाचा महिला कर्मचाऱ्याला बाजूला बोलवत चुंबनाचा प्रयत्न
पुणे | महिला कर्मचारीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे एका ७० वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या ३९ वर्षीय सहकारी महिलेला ”पप्पी दे”, म्हणत तिचा विनयभंग केला आहे. हा सगळा प्रकार १३ डिसेंम्बर रोजी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी ७० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार राजीव विनायक विळेतकर (वय ७०) यावर गुन्हा दाखल झाला आहे.