कल्याण स्थानकात धावत्या एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशांचा मोठा अपघात, एकाचा मृत्यू
कल्याण | Deccan Queen Express Accident – कल्याण (Kalyan) स्थानकात मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. कल्याण स्थानकामध्ये धावत्या एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशांचा अपघात (Accident) झाला. दोन प्रवासी धावती एक्सप्रेस पकडत असता त्यांचा पाय घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.
कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेस थांबत नाही, पण या स्थानकावर एक्सप्रेसचा वेग कमी होतो. त्यावेळी धावती एक्सप्रेस पकडत असताना दोन प्रवासी पाय घसरून पडले. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. यानंतर स्टेशनवरील हमालांनी जखमीला तातडीनं रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे.
ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेले रेल्वे पोलीस लगेच तिथे पोहोचले. तर आता आर पी एफ आणि जी आर पी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच ही घटना स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.